पेडणे (प्रतिनिधी )
पेडणे तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात काजू उत्पादन घेण्यात येते .माञ यंदा या काजू उत्पादन घेणाऱया व्यावसायिक यांना कोरोनाच्या ला?कडाऊनचा मोठा फटका बसला आहे. पेडणे तालुक्मयात काजू (बोंडू) पासून मोठय़ा प्रमाणात काजू फेणी तसेच हुर्राक ही दारु काढली जाते. माञ यंदा काजू उत्पादनात घट झाल्याने आणि कोरोनाचे सावट असल्याने ला?कडाऊनचा फटकाही काजू व्यावसायिक यांना बसल्याने काजू व्यावसायिकांना चिंता वाटू लागली आहे.
सध्या राज्यात काजू हंगाम सुरू झाला असून यंदा या हंगामात काजू उत्पादन खूपच घटल्याचे दिसून येत आहे. पेडणे तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात काजू बागायती आहेत.माञ यंदा म्हणावा सा हंगाम नसल्याने काजू हंगाम हा एरवी मार्च महिन्यात पहिल्या आठवडय़ात सर्वत्र सुरू होत होता माञ तो मार्च संपला तृरी जोमाने सुरु झाला नसल्यामुळे काजू उत्पादन घेणारे चिंताग्रस्त आहेत.
ड़ पेडणे तालुक्मयात महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग तसेच कोकण भागातून येणारे काजू (बोंडू) ला?कडाऊन मुळे न आल्याने मोठा फटका
पेडणे तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात मार्च व एप्रिल महिन्यात काजू फेणी काढण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हातून तसेच देवगड व इतर भागातून बोंडू गाडीतून आणले जातात व यातून मोठय़ा प्रमाणात हुर्राक तसेच काजू फेणी काढली जाते. पेडणे तालुक्मयात खास करुन पञादेवी सिमेलगत या दारु काढण्याच्या भट्टय़ा उभा केल्या जातात. माञ यंदा या भट्टय़ा उभारण्यात आल्या असल्यातरी या भट्टय़ांना काजू बोंडू मिळत नसल्याने काही भट्टय़ा ह्या यंदा बंदच आहेत.









