भितीचे वातावरण पसरले, वारखंड येथे एकाच कुटुंबातील दहाजणांना बाधा
प्रतिनिधी / पेडणे
पेडणे तालुक्मयात रविवारी पेडणे तालुक्मयात नवीन चौदा कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण सापडल्याने पेडणे तालुक्मयात भितीचे वातावरण पसरले. वारखंड येथील एकाच कुटुंबातील दहाही व्यक्तीना व धारगळ येथील आयुष हॉस्पिटल बांधकाम करणाऱया तीन कामगारांना कोरोना रुग्ण सापडले तर दांडोसवाडा मांदे येथे एक कोरोना पाॕझिटिव्ह सापडल्याने दिवसभरात 14 कोरोना रुग्ण सापडले. पेडणे तालुक्मयात आता पर्यंत 62 कोरोना पॉझिटिव्ह सापडलेले आहे .
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पाॕझिटिव्ह रुग्ण मिळालेल्या त्या घरांचे तसेच परिसराचे निर्जंतुकिकरण करण्यासाठी पेडणे अग्निशमन दलाकडे साधन सुविधांचा अभाव आहे . अग्निशमन दलाच्या संचालकाचा या पेडणे केंद्रावर दुर्लक्ष झाल्याने आज पर्यंत पेडणे अग्निशमन दलाचे कार्यालय म्हणजे कोंडवाडा असल्यासारखे त्या कार्यालयात प्रत्यक्ष जावून पाहिल्यास कर्मचारी कसे वास्तव करतात हे दिसून येते.
पेडणे तालुक्मयात जसे जसे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्याच प्रमाणे अग्निशमन दलाला त्या त्या परिसराचे फवारणीचे काम करावे लागते . एका बाजूने रस्त्यावर घरावर पडलेली झाडांचे अडथळे दूर करण्याचे ताण असताना आता कोरोना रुग्णाच्या घराचे त्या परीसराचे निर्जंतुकिकरण करावे लागत आहे . मात्र आवश्यक ती साधन सुविधा तसेच निर्जंतुकिकरण फवारणीसाठी लागणारे औषध याची कमतरता असल्याने पेडणे आग्निशमध दलापुढे मोठी समस्या आहे.
वारखंड पंचायत क्षेत्रात एकाच दिवशी दहा कोरोना पाॕझिटिव्ह
पेडणे तालुक्मयातील वारखंड गावातील एक व्यक्ती कुरियर कंपनीत कामाला होती . त्याच्या बरोबर वास्को येथील एक कोरोना बाधित व्यक्तीचा संपर्क आल्याने तो कोरोना बाधित आहे कि नाही या साठी त्यांनी आपली कोरोना चाचणी केली . त्याचा अहलाव येईपर्यंत त्याने होम कॉरंटाईन होणे गरजेचे होते . मात्र ती व्यक्ती घरात न थांबता बार , दुकानात तसेच गावात फिरली होती . तीन दिवसानंतर ती व्यक्ती ही कोरोना बाधित असल्याचे कळले . त्यामुळे गावकरी भयभीत झाले सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून करून घेतली . त्यातील इतरांची नकारात्मक अहवाल आले , मात्र त्या व्यक्तीच्या सर्व कुटुंबीय सदस्यांचे अहवाल मात्र पाॕझिटिव्ह आले.त्यामुळे पुन्हा एकदा वारखंड गावात भितीचे वातावरण पसरले.
एका कुटुंबातील सर्वाना कोरोना लागण झाल्याची पेडणे तालुक्मयातील हि पहिलीच घटना आहे. धारगळ येथे आयुष हॉस्पिटलचे सध्या जोरदार काम सुरु आहे. त्या ठिकाणी काम करण्या साठी आलेल्या तिघाना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती मिळाली. हे तिन्ही कामगार कल्याण मुंबई येथून आले होते. त्यांनी लगेच टेस्ट करून स्वतःला होमकॉरंटायीन करून घेतले होते , त्यांचा संपर्क कुणाकडे आला नाही.
नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी : उपमुख्यमंञी बाबू आजगावकर
पेडणे तालुक्मयात मिळत असलेल्या कोरोना रुग्णृसंख्येच्या या पाश्वभूमीवर या भागाचे स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी नागरिकाना आवाहन करताना कुणीही घाबरून जावू नये . आपण सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी . लोकांनी कामानिमित्ताने बाहेर पडताना तोंडाला मास्क वापरणे , सुरक्षितत शाररीक अंतर ठेवणे , हात स्वच्छ धुणे , आरोग्य खात्याने घालून दिलेल्या नियमाचे पालन करणे गरजेचे असून नागरिकांनी घाबरून जावू नये . असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आवाहन केले .
दरम्यान उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या प्रयत्नाने लगेच रविवारी सापडलेल्या पेडणे मतदारासंघातील तेराही कोरोना रुग्णांना डिचोली कोरोना सेंटरमध्ये हलवण्यात आले आणि परिसराचे निर्जुतुनीकरण करण्यात आले .
मागच्या वेळी खाटा उपलब्ध नसल्याने वारखंड 1 व वझरी येथील 5 कोरोना रुग्णांना 24 तास घरातच राहावे लागले होते . कोरोना सेंटरमध्ये खाटा उपलब्ध नसल्याने त्याना 24 तासानंतर हलवण्यात आले होते . आज मात्र 13 रुग्णांना त्वरित हलवण्यात आले .
ड़ कोनाडी कोरगाव येथील वाडय़ावर आठ रुग्ण सापडल्यानंतर लगेच दुसऱया दिवशी या वाडय़ावरील 60 नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या त्या सर्वांचे रविवारी अहवार नकारात्मक आले. मांदे तसेच इतर भागातील 148 जणांचे अहवाल नकारात्मक आल्याची माहिती तुये आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डाॕ.विद्या परब यांनी दिली.
पेडणे तालुक्मयात 62 कोरोना बाधित संख्या
पेडणे तालुक्मयात आता पर्यंत सर्वाधिक 17 कोरोना वझरी पंचायत क्षेत्रात , त्यानंतर प्रत्येकी 11 रुग्ण कोरगाव व वारखंड , मांदे 9 , पालये 2 , विर्नोडा 4 , पेडणे 1 , पोरस्कडे 1 , हरमल 1 , हसापुर 1 धारगळ 4 मिळून 62 रुग्णाची नोंद झाली आहे.









