प्रतिनिधी / पेठ वडगाव
पेठ वडगावात आज पाच वर्षाचा मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. चार दिवसापूर्वी त्याच्या वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह येवून त्यांच्यावर उपचार सुरु होते. सध्या या रुग्णामुळे शहराची कोरोना रुग्ण संख्या ३४५ झाली असून यातील ३३१ जण बरे झाले आहेत. आजअखेर मृत्यू संख्या दहा झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या चार असून रुग्णसंख्या घटली असल्याचे आशादायी चित्र आहे. वडगाव शहर कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे.
मात्र सध्या एक अथवा दोन रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. वडगाव बाजारात नवरात्रोत्सवाची खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र पालिका प्रशासनाने बाजारात गर्दी होवू नये, विनामास्क नागरिक फिरू नये यासाठी या बाबत जनजागृती करून कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी प्रभावी जनजागृती व नियम न पाळणार्यावर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.









