प्रतिनिधी / पुलाची शिरोली
हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालकांचा पाच वर्षाचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक अमरसिंह शिंदे यांनी करवीरचे उपनिबंधक प्रदीप मालगावे यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. मालगावे यांनी शुक्रवारी ११ रोजी प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.
या समितीमध्ये अशासकीय संचालक मंडळ नेमण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये हालचाली गतीमान झाल्या आहेत. कार्यकर्त्यांनी आपली वर्णी लावण्यासाठी नेत्यांना साकडे घालण्यास सुरुवात केली आहे . शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक ,आमदार विनयरावजी कोरे ,आमदार प्रकाशराव आडे यांच्या गटाची सत्ता होती. या बाजार समितीचा पाच वर्षाचा कार्यकाल नुकताच संपुष्टात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाचे संचालक व सचिव यांनी जिल्हा उपनिबंधक यांना आदेश देऊन प्रशासक नियुक्त करण्यास सांगण्यात आले होते.
त्यांनुसार जिल्हा उपनिबंधक शिंदे यांनी करवीरचे उपनिबंधक प्रदीप मालगावे यांची निवड केली आहे.शासनाच्या निर्णयानुसार अकरा जणांचे अशासकीय संचालक मंडळाची निवड केली जाणार आहे. महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर असल्यामुळे तोच फॉर्मूला या बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडीमध्ये वापरण्यात येणार आहे . त्यानुसार राष्ट्रीय काँग्रेस पाच जागा, राष्ट्रवादी काँग्रेस तीन जागा व शिवसेनेला तीन अशा एकूण अकरा जागांची निवड ज्या त्या पक्षाचे नेते करणार आहेत . मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार काँग्रेस , राष्ट्रवादी व शिवसेना यांनी आपल्या व्यक्तींच्या निवडी केल्या आहेत.
राष्ट्रीय काँग्रेसने आपल्या वाटयातील एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देवू केली आहे . निवड झालेल्या मध्ये खोची, सावर्डे , आळते , कोरोची , इचलकरंजी, हुपरी आदी गावातील कार्यकर्त्यांना संधी दिली असल्याचे समजते . यामध्ये विशेषता इचलकरंजीचे नगरसेवक मदन कारंडे यांची निवड झाल्याचे समजते.
महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या महामारीमुळे मुदत संपलेल्या सहकारी संस्थांना सहा महिन्याची मुदत वाढ दिली आहे .यामध्ये जिल्हा सहकारी व नागरी बँका , सूतगिरणी ,साखर कारखाने व दूध संघ आदींचा समावेश आहे . पण शेती उत्पन्न बाजार समितींना मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे . त्यामुळे राज्यातील सुमारे सात बाजार समितीच्या संचालक मंडळाने राज्याचे पणन सचिव व पणन संचालक यांच्याकडे इतर संस्था प्रमाणे मुदतवाढ मिळावी व प्रशासक नेमणूक करु नये म्हणून याचिका दाखल केली आहे. तत्कालीन सभापती सुरेशराव पाटील, पेठवडगाव बाजार समिती.
Previous Articleमर्मज्ञांचे विस्मरण होत असल्यामुळे…
Next Article आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा









