प्रतिनिधी / पेठ वडगाव
वडगाव – हातकणंगले रस्त्यावर पेठ वडगाव येथे असलेल्या वडगाव पोलीस ठाण्याच्या समोरील गटार गेल्या कित्येक वर्षापासून पूर्ण न झाल्याने कायद्याचे रक्षण करणारे पोलीस अस्वच्छतेच्या विळख्यात अशी अवस्था झाली आहे. या प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने व स्वच्छता सर्व्हेक्षण मध्ये क्रमांक आला असल्याचा ढोल वाजवत असलेल्या वडगाव पालिकेने गांभीर्याने लक्ष देवून या ठिकाणी गटार करण्याची मागणी नागरीकातून होत आहे. तर अर्धवट गटार बांधकाम ठेवलेल्या संबंधित ठेकेदाराच्या कामाची बिले बांधकाम विभागाने अदा करण्यात आली आहेत का ? याबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरीकातून होत आहे.
पेठ वडगाव शहरात वडगाव हायस्कूल परिसरातून ते पोलीस ठाणेपर्यंत गटार नसल्याने कायद्याचे रक्षण करणारे पोलीस घाण आणि दुर्गंधीच्या साम्राज्यात आहेत. या ठिकाणी गटारीच्या पाण्यामुळे पोलीस ठाणे परिसरात डासांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच बरोबर विद्यालय परिसरात अर्धवट गटार बांधून हे काम पुढे बंद ठेवण्यात आले आहे.
गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसात अनेक वेळा गटारीतील पाण्याचे लोट रस्त्यावरून पलीकडे काही घरात घुसून नागरिकांचे नुकसान झाले आहे. या परिसरातील नागरिक पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करून काहीही उपयोग होत नसल्याने या मतदार संघाचे खासदार व आमदार यांनी या प्रश्नाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास ही गटार पूर्ण करण्याबाबत सूचना द्याव्यात अशी मागणी होत असून अर्धवट गटार बांधून काम ठप्प ठेवलेल्या संबंधित ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणीही नागरीकातून होत आहे. जर बांधकाम विभागाने या अर्धवट बांधलेल्या गटारीच्या कामाचे बिल अदा केले असेल तर संबंधित अधिकारी व ठेकेदार यांचेवरही कारवाई करावी अशा संतप्त भावना या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत.
कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी असलेल्या पोलीस प्रशासनाला अस्वच्छतेच्या वातावरणात काम करावे लगत आहे. वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचार्यांना अनेक सुविधा पुरवत, स्वच्छता, दप्तर विभागणी व वर्गवारी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक दक्षता यामुळे पोलीस ठाण्याच्या कामात सुसूत्रता आणली आहे. पोलीस ठाण्याचे अंतर्गत रंगरूप पालटले आहे. मात्र पोलीस ठाण्यात प्रवेश द्वारासमोर गटार नसल्यामुळे घाण दुर्गंधीच्या साम्राज्यात काम करावे लागत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे या भागातील लोकप्रतिनिधी, वडगाव पालिकेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी ही गटार पूर्ण होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








