देशात इंधनदरवाढीवरून ओरड सुरू असताना दुसरीकडे विदेशात मत्र इंधनाची आणि विशेषकरून पेट्रोलची एका वेगळय़ा कारणासाठी चर्चा सुरू आहे. पेट्रोलचा सुगंध असलेल्या सेंटमुळे ही चर्चा होत आहे. हा सेंट विशेषकरून इलेक्ट्रिक वाहने चालविणाऱयांसाठी तयार करण्यात आला आहे. तंत्रज्ञानामुळे पेट्रोलच्या गंधापासून दुरावलेल्या चालकांसाठी जगप्रसिद्ध फोर्ड कंपनीने हा जुगाड शोधून काढला आहे. विशेष म्हणजे या सेंटला मोठी मागणी आहे.

ईलेक्ट्रिक वाहनांची सवय व्हावी म्हणून फोर्डने ‘मॅच-एऊ’ नावाने नवीन प्रीमियम सेंट तयार केला आहे. नवीन सेंट पारंपरिक पेट्रोलवर धावणाऱया वाहनांप्रमाणेच गंध देणार आहे. केवळ पेट्रोल नव्हे तर फ्यूज स्मोकी ऍकार्ड, रबर इत्यादींचा गंधही यातून मिळणार आहे.
फोर्डच्या सर्वेक्षणानुसार 5 पैकी एका चालकाने इलेक्ट्रीक वाहनांचा वापर करताना पेट्रोलचा वास आठवत असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर पेट्रोलचा वास हा वाइन आणि चीज या दोन्हींपेक्षा यादीत सर्वात वर असल्याचे सर्वेक्षणात म्हटले गेले आहे. नवीन सेंट इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अधिक स्वारस्य निर्माण करण्यास मदत करणार असल्याचे फोर्डचे मानणे आहे.









