ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीवरुन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पेट्रोलियम पदार्थांवर टॅक्स लावून केंद्र सरकारने 23 लाख कोटी रुपये कमावल्याचे प्रियंका यांनी म्हटले आहे.
प्रियंका गांधीनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही दररोज महाग पेट्रोल आणि डिझेल खरेदी करता तेव्हा लक्षात ठेवा, मोदी सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवर लावलेल्या करातून 23 लाख कोटी रुपये कमावले आहेत. रोज महाग तेल-भाज्या विकत घेताना लक्षात ठेवा की, या सरकारने 97 टक्के कुटुंबांचे उत्पन्न कमी केले पण मोदीजींचे अब्जोपती मित्र दररोज 1000 कोटी कमावत आहेत.









