2 हजार कोटींची 44 लाख कर्जे वितरीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डिजिटल माध्यमातून पैशाच्या देवाण-घेवाणीचा व्यवहार करण्याची सोय उपलब्ध करणाऱया पेटीएमने डिसेंबरला संपलेल्या तिसऱया तिमाहीमध्ये कर्जाच्या संख्येत आणि कर्जाच्या रकमेत दोन्हीमध्येही मोठी वाढ दर्शवली असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
दोन्हींची मागणी चारपट वाढली असल्याची बाब पेटीएमने शेअर बाजाराला स्पष्ट केली आहे. पेटीएम कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या काळामध्ये 2 हजार 180 कोटी रुपये किमतीची 44 लाख कर्जे वितरित केली आहेत. 2020 मध्ये समान अवधीमध्ये कंपनीने 470 कोटी किंमतीची 8.81 लाख कर्जे वितरीत केली होती. सदरच्या तिमाहीमध्ये कंपनीचे सकल व्यवसाय मूल्यही दुप्पट होऊन 2.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.









