16 हजार 600 कोटी उभारणार ः नोव्हेंबरमध्ये बाजारात येणार
नवी दिल्ली
भारतीय भांडवली बाजारातील नियामक सेबीने पेटीएमच्या आयपीओला मंजुरी दिली आहे. कंपनीचा आयपीओ नोव्हेंबरमध्ये शेअरबाजारात लिस्टिंग होणार आहे. ब्लूमबर्गच्या सूत्रांकडून अर्जाला मंजुरी मिळाल्याची माहिती आहे.
पेटीएम आयपीओतून येत्या काळात 16 हजार 600 कोटी रुपये उभारणार आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ मानला जात आहे. जर का वरील लक्ष्य साध्य झाले तर 2013 मध्ये कोल इंडियाने आयपीओतून उभारलेल्या 15 हजार कोटीपेक्षाही तो अधिक असेल. मागच्या जुलै महिन्यात पेटीएमने सेबीकडे रितसर परवानगीकरीता अर्ज सादर केला होता. यात समभागांमार्फत 8300 कोटी तर विक्री प्रस्तावामार्फत 8300 कोटी उभारण्याचे म्हटले होते. याचाच अर्थ एकूण 16 हजार 600 कोटी रुपये या आयपीओतून उभे करण्याचे कंपनीचे लक्ष्य असेल.









