ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेगासस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
19 जुलैला संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाले. तेव्हापासून संसदेच्या दोन्ही सभागृहात पेगासस हेरगिरीच्या मुद्यावरुन गदारोळ सुरू आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टात अनेकांकडून याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
इस्रायली कंपनी एनएसओने विकसित केलेल्या पेगासस सॉफ्टवेअरने भारतातील जवळपास 300 मोबाईल नंबरची हेरगिरी केल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासह प्रमुख राजकीय नेते, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, 40 पत्रकार आणि काही अन्य लोकांचा समावेश आहे.