ऑनलाईन टीम / मुंबई :
येत्या 31 मार्च अखेर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक न केल्यास आता प्राप्तिकर कायद्यांतर्गत संबंधितांवर कडक कारवाई आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशारा प्राप्तिकर विभागाने दिला आहे.
आर्थिक वर्ष संपायला 28 दिवसांचाच कालावधी उरला असून, या काळात पॅन कार्ड आधार कार्डशी जोडणे बंधनकारक आहे. दोन्ही कार्ड एकमेकांना न जोडल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होणार असल्याचा इशारा यापूर्वीच प्राप्तिकर विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाने नवी अधिसूचना जारी केली आहे. 31 मार्चपर्यंत आधार-पॅन एकमेकांना जोडले न गेल्यास निष्क्रिय झालेल्या पॅनकार्डचा वापर करता येणार नाही. निष्क्रिय झालेल्या पॅन कार्डचा संबंधिताकडून वापर झाल्यास प्राप्तिकर कायदा कलम 272 बी अन्वये 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना जोडण्याची मुदत वारंवार गरजेनुसार वाढवण्यात आली आहे. त्याची अंतिम मुदत 31 मार्च 2020 पर्यंत आहे. या काळात पॅन-आधार कार्डला लिंक न झाल्यास संबंधित पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येणार आहे.









