जय शिवराय किसान संघटनेची मागणी
प्रतिनिधी/कोल्हापूर
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने नागरी वस्तीसह शेत व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दोन वर्षापूर्वी आलेल्या महापुरानेही पिके कुजून मोठा फटका शेतकर्यांना बसला आहे. त्यात यंदाही त्याची झळ बसली आहे. त्यामुळे पुरबाधित शेतकर्यांची पिक कर्जमाफी करावी, या मागणीचे निवेदन बुधवारी जय शिवराय किसान संघटनेतर्फे निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात म्हंटले आहे की, यावर्षी प्रमाणेच 2019 लाही अतिवृष्टी होऊन शेतकयांचे प्रचंड नुकसान झालेले होते. यात भरीत भर म्हणून कोरोनामुळे शेतमाल विक्रीला प्रचंड फटका बसला आहे. यावर्षीच्या महापुराने तर कहरच केला . सन 2019 पेक्षाही पाणी पातळी प्रचंड वाढल्यामुळे शेतातील पिके पूर्णपणे कुजली आहेत. तसेच नदी व ओढयाकाठालगतची शेतीही खचल्यामुळे प्रचंड नुकसान व मन:स्ताप शेतकर्यांना सोसावा लागत आहे. यावर्षीचा पूरही एकाच दिवसात अचानक वाढल्यामुळे जी गावे बाधित झाली तेथील नागरीकांचे प्रापंचिक साहित्य व घरामध्ये असणारे धन – धान्य पूर्णपणे बुडाले आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून पूरबाधित शेतकयांना कोणताही निकष न लावता सरकारकडून पिक कर्जमाफी मिळावी. कारण ज्या शेत पिकांवर शेतकन्यांनी कर्ज उचलले आहे. ती पिकेच पूर्णपणे नष्ट झालेली आहेत. त्यामुळे शेतातच पिके नाहीत तर कर्ज कसे आणि कुठून फेडणार ? शिवाय अजूनही कोरोनाची महामारी सुरूच आहे. त्यामुळे इथून पुढेही भाजीपाला किंवा इतर पिके घ्यायचे झाली तरी त्याची विक्रीव्यवस्था करण्यावर निबंध आहेत. तरी आपण याचा गांभिर्याने विचार करावा. तसेच ज्या शेतकन्यांची जितकी जनावरे दगावली आहेत, तितकी भरपाई द्यावी. त्याचबरोबर पूरबाधित दुकानदार, पानटपरी, कुकुटपालन, मत्स्यबोटी व जाळी यासाठी सुध्दा नुकसान भरपाईबाबत शासनाने दिलेले निकष अपुरे आहेत. त्याऐवजी पंचनाम्याप्रमाणे होणारी पुर्ण नुकसान भरपाई शासनाने संबधितांना द्यावी.
शिष्टमंडळात उत्तम पाटील, बंडा पाटील, शिवाजी शिंदे, राजेश पाटील, प्रताप चव्हाण, शितल कांबळे, रामदास वड्ड, संदीप शिंदे आदींचा समावेश होता.
नुकसान झालेल्या पिकांना भरपाई द्या : शेतकरी संघटना
महापुराने पंचगंगा, वारणा, दुधगंगा, भोगावती, कुंभी, कासारी, चिकोत्रा, हिरण्यकेशी आदी नदीकाठच्या हजारो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यावरील ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग आदी विविध पिकांचे मोठÎा प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी नुकसान झालेल्या पिकांची भरपाई शेतकर्यांनी मिळावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष ऍड. माणिक शिंदे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली.