कुर्डुवाडी / प्रतिनिधी
नवी दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) नोव्हेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या सी. ए. अंतिम परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत पूजा कांतीलाल बलदोटा या कुर्डुवाडी शहरातील पहिल्या महिला चार्टर्ड अकाउंटंट ( सिए) झाल्या. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पूजा यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण कुर्डुवाडी येथे झाले असून महाविद्यालयीन बीकॉम व एमकॉम पुणे येथे झाले आहे. त्यांना त्यांचे वडिल कांतीलाल बलदोटा, आई धनश्री बलदोटा, भाऊ रुपेश बलदोटा, शिक्षक व नातेवाईकांचे सहकार्य मिळाले. पुजा बलदोटा म्हणाल्या मी सीए व्हावे ही वडिलांची खूप इच्छा होती. त्यांच्या पासून प्रेरणा घेत जिद्दीने, योग्य दिशेने सातत्याने अभ्यास करत सीएच्या परीक्षेत यश संपादन केले.
Previous Articleशिवसेनेचे संभाव्य उमेदवार मंगळवारी होणार जाहीर
Next Article पूर्वी पुजारा तर आता पंतप्रमाणे फलंदाजी!









