वार्ताहर / पुसेगाव :
पुसेगाव ता. खटाव येथील येरळा नदीकाठी असलेल्या काळजाई शिवारातील एका विहिरीत साधारण 36 वर्षाच्या पुरुषाचा सडलेला मृतदेह आढळून आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी याबाबत माहिती दिली.
पुसेगाव येथील येरळा नदीकाठी बाळकृष्ण सावंत यांची येरळा नदीकाठी काळजाई शिवारात विहीर आहे. नेहमीप्रमाणे आपल्या शेतमजुराबरोबर मोटार चालू करण्यासाठी शनिवारी सकाळी 8 वाजता विहिरीवर गेले. त्यावेळी अंदाजे 36 वर्षाच्या पुरुषाचा सडलेला मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबत पुसेगाव पोलिसांना माहिती दिली. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला.
पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. त्यानुसार दोन-चार दिवसांपूर्वी पाण्यात पडून मयत झाले आहे. अशी नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मयत व्यक्तीची ओळख पटली नाही. अंगात टी शर्ट , काळी पॅन्ट व वरून जॅकेट घातले आहे. जर याबाबत कोणाला माहिती असेल तर पुसेगाव पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन सपोनि संदीप शितोळे यांनी केले आहे.









