अल्लू अर्जुनचा बॉक्स ऑफिसवर धमाका
दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा ः द राइज’ हा चित्रपट 17 डिसेंबरला प्रदर्शित झाला असून त्याला चाहते तसेच समीक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाने 3 दिवसात म्हणजेच फर्स्ट वीकेंडवर 173 कोटी रुपये कमाविले आहेत. चित्रपटाने जगभरात तिसऱया दिवशी (रविवारी) 57 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर पहिल्या (शुक्रवारी) 71 कोटी आणि दुसऱया दिवशी (शनिवारी) 45 कोटी रुपयांचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमविला होता.

चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 3 दिवसात आतापर्यंत 12 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. पुष्पा ः द राइज या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. चित्रपटातील अल्लू अर्जुन अन् रश्मिका ही जोडी प्रेक्षकांना विशेष पसंत पडत आहेत. तर समांथा रुथ प्रभूवर चित्रित गाण्याने प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडून खेचून आणले आहे.









