प्रतिनिधी / बेळगाव
महषी रोड, टिळकवाडी येथील पुष्पमाला वसंत गायकवाड व त्यांची कन्या लीना कदम यांनी लोकमान्य ग्रंथालयाला पुस्तकांची भेट दिली. त्यांचे पती कै. वसंत गायकवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही भेट देण्यात आली. वसंत गायकवाड हे पुस्तकांचे संग्राहक होते. त्यांच्याकडे शेकडो पुस्तके संग्रहाला होती. या पुस्तकांचा समाजाला उपयोग व्हावा, या उद्देशाने ही पुस्तके लोकमान्य ग्रंथालयाला देण्यात आली.
ऐतिहासिक, धार्मिक, साहित्यिक अशी इंग्रजी व मराठी 100 हून अधिक पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे. यापूवीर्ही वसंत गायकवाड यांनी लोकमान्य गंथालयाला 200 हून अधिक पुस्तके दिली आहेत. ज्यावेळी लोकमान्य ग्रंथालयामध्ये नवीन पुस्तके खरेदी करण्यात येतील, त्यावेळी ग्रंथालयाला मदत करण्याची ग्वाही पुष्पमाला गायकवाड यांनी दिली. लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब यांच्याकडे पुस्तके देण्यात आली. पंढरी परब यांनी गायकवाड यांचे आभार मानून गायकवाड यांच्यामुळे पुस्तके वाचण्याचा छंद जोपासल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सीईओ अभिजित दीक्षित, समन्वयक विनायक जाधव उपस्थित होते.









