ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यात कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या 3 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. 1 ते 3 मे मध्यरात्रीपर्यंत या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीवनावश्यक वस्तूंची सर्वच दुकाने बंद ठेवली जाणार आहेत.
उद्या (दि.1 ) सकाळी 6 वाजल्यापासून ते 3 मे रात्री 12 वाजेपर्यंत समर्थ पोलीस ठाणे, खडक आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीस बंदी आहे. सकाळी 10 ते 12 या वेळेत फक्त दुधविक्री सुरू राहील. घरपोच दूध वितरणासाठी सकाळी 6 ते 10 वेळ निश्चित करण्यात आली आहे. सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी याबाबतची माहिती दिली.








