ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील खराडी भागात एका कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली आहे. मोकळ्या मैदानात दगडाने ठेचून त्याला ठार मारण्यात आले आहे. शैलेश घाडगे असे हत्या झालेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारस खराडी परिसरात ही घटना घडलीये. मारेकऱ्यांनी डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. अनेक गुन्ह्यांमध्ये शैलेश आरोपी होता. शैलेशच्या नावावर अनेक गुन्ह्यांची देखील नोंद आहेत.
- आयुक्तालयाजवळ गोळीबाराचा थरार
तर दुसरीकडे, पुणे पोलीस आयुक्तालयाजवळ एका वृध्द नागरिकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एसबीआय ट्रेझरी कार्यालयासमोर हा फायरिंगचा प्रकार घडला. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला त्या व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. राजेश कनाबर (वय 63) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान, सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांचा तपास सुरू आहे, असे बंडगार्डन पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.