ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाची लागण झाल्यामुुुुळे गेल्या पाच सहा दिवसांपासून रुग्णालयात असलेले पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना गुरुवारी सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला. परंतुु 15 जुलै पर्यंत त्यांना घरी राहण्यास सांगितले आहे. स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने आज मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. येत्या 15 तारखेपर्यंत होम क्वारंटाईनची सूचना डॉक्टरांकडून मिळाली आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद! होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा २४ तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेल, याचं नक्कीच समाधान आहे, असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
दरम्यान, मोहोळ यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली. त्यांच्यातील काही जणांवर रुग्णालयात तर काहींवर घरीच उपचार सुरू आहेत.








