ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 44 हजार 825 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 77 हजार 826 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 30 हजार 803 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 849 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 57.60 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्हयातील 63 हजार 808 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 38 हजार 519 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 23 हजार 720 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 16 हजार 775, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 841, व पुणे कॅन्टोंन्मेंट 210, खडकी विभागातील 40, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 769, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 85 रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 3 लाख 84 हजार 989 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 3 लाख 79 हजार 900 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 89 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 1 हजार 295 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे. तर 77 हजार 826 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.








