ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 4 लाख 71 हजार 84 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 4 हजार 965 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 19 हजार 767 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 114 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 93.29 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 24 हजार 294 रुग्णांपैकी 3 लाख 4 हजार 550 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 11 हजार 929 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 815 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.41 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 93.91 टक्के आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 24 लाख 5 हजार 61 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 4 हजार 965 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.