ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 46 हजार 620 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 80 हजार 405 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 31,522 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 60 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.98 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 65 हजार 591 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 40 हजार 45 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 23 हजार 927 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 16 हजार 562, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 5 हजार 117 व पुणे कॅन्टोंन्मेंट 174, खडकी विभागातील 32, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 957, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 85 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 619 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 154, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 281 व पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 32, ग्रामीण क्षेत्रातील 79, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 42 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 827 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 61.05 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.47 टक्के इतके आहे.