ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 79 हजार 312 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 20 हजार 597 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 38 हजार 122 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 65.77 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 94 हजार 978 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 66 हजार 640 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 26 हजार 153 आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित एकूण 2 हजार 185 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 70.16 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 लाख 27 हजार 410 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 20 हजार 597 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.