ऑनलाईन टीम / पुणे :
27 फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस अर्थातच मराठी राज्यभाषा दिन आपल्या मराठी भाषेचा गौरव करणारा दिन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 12 च्या वतीने कोथरूडमधील मनसेचं कोथरूड गड या कार्यालयाजवळ मराठी राजभाषा दिन ‘ मी मराठी… माझी स्वाक्षरी मराठी…’ साजरा करण्यात आला.
आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगत असताना आपली भाषा ही ज्ञानभाषा असून ती दैनंदिन वापरामध्ये व्यापाराची भाषा बनावी तिचा अधिकाधिक वापर होऊन मराठी भाषेचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरूड उपविभाग अध्यक्ष संजय काळे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. कोथरूड परिसरातील असंख्य नागरिकांनी उस्फूर्तपणे कुटुंबासह येऊन मराठी भाषेमध्ये आपली स्वाक्षरी नोंदवून या कार्यक्रमाला उपस्थिती लावत मराठी भाषेचा अधिकाधिक जागर करण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस ॲड. किशोर शिंदे यांनी सर्वप्रथम मराठीमध्ये स्वाक्षरी करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कोथरूडचे ग्रामस्थ सुभाष कुंबरे, सिताराम मोकाटे,आबासाहेब मोकाटे,इंद्रजीत मोकाटे,डॉ.अजय तायडे,ॲड.अशोक मोहिरे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींनी मराठीमध्ये स्वाक्षरी करून मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
मराठीमध्ये स्वाक्षरी करण्यासाठी यूपीएससी एमपीएससीचा सराव करणाऱ्या असंख्य मुली या उपक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या हे या मराठी भाषा दिनाचे प्रमुख आकर्षण ठरले.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे,विभाग अध्यक्षा सुरेखाताई होले,श्रीकांत अमराळे, शशांक अमराळे,प्रशांत पायगुडे,अरुण हुलावळे,शाखाध्यक्ष विराज डाकवे, ओंकार नाईक,सुशांत भुजबळ, अमित ठोंबरे,रोहित मोकाटे, धनंजय बलकवडे,तुषार कंधारे, रणजीत कुंबरे, आकाश शेलार आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.








