प्रतिनिधी/कोल्हापूर
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू झाले आहे. सकाळपासून पदवीधर मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केल्याने यंदाच्या वर्षी दुपारपर्यंतच कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी मतदान झाले आहे. पुणे पदवीधर मतदार संघासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत २८.३६% तर शिक्षक मतदार संघासाठी ४३.१२% मतदानाची नोंद झाली आहे.
सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी मोठी गर्दी केली होती. यामुळे यंदाच्या वर्षी या निवडणुकीत मोठी चुरस होणार असल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघांसाठी दुपारपर्यंत झालेले मतदान पुढीलप्रमाणे
जिल्हा : कोल्हापूर
पदवीधर मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: २०५)
पुरुष पदवीधर मतदार: ६२७०९
स्त्री पदवीधर मतदार: २६८२०
एकूण पदवीधर मतदार: ८९५२९
सकाळी ८ ते १२ या कालावधीत झालेले मतदान
पुरुष: १९८८२
स्त्रीः ५५०९
एकूण : २५३९१
मतदान टक्केवारी : २८.३६%
शिक्षक मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: ७६)
पुरुष शिक्षक मतदार: ८८७९
स्त्री शिक्षक मतदार :३३५८
एकूण शिक्षक मतदार: १२२३७
सकाळी ८ ते १२ कालावधीत झालेले मतदान
पुरुष: ४१७५
स्त्रीः ११०२
एकूण : ५२७७
मतदान टक्केवारी ४३.१२%