क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत आजपासून गोवा आणि आंध्रप्रदेश यांच्यातील चार दिवशीय लढतीला पर्वरीतील पर्वरी क्रिकेट अकादमीवर सुरूवात होत आहे. गोव्याने आपल्या मागील लढतीत सांगे क्रिकेट अकादमीवर अरुणाचल प्रदेशला डावाने पराभूत केले होते. आंध्र व बिहार यांच्यातील मागील सामना अनिर्णीत राहिला होता व यात आंध्रने पहिल्या डावातील आघाडीचे 3 गुण प्राप्त केले होते.
गोव्याचे पाच सामन्यांतून एक विजय, तीन पराभव व एका अनिर्णीत लढतीने 10 गुण झाले असून ते त्यांच्या गटात सहाव्या स्थानावर आहेत. आंध्रप्रदेशने पाच सामन्यांतून दोन विजय नोंदविले आहेत. त्यांचे दोन सामने अनिर्णीत राहिले असून एका सामन्यात त्याना पराभूत व्हावे लागले आहे. आंध्रचे 18 गुण झाले असून ते चौथ्या स्थानावर आहेत. आंध्रच्या संघात पी. गिरीनाथ रेड्डी, वाय. संदीप व टी. विजय हे रणजीपटू आहेत.
गोव्याचा संघ ः दीपराज गावकर (कप्तान), राहुल मेहता, मंथन खुटकर, दिगेश रायकर, योगेश कवठणकर, कश्यप बखले, वासू तिवारी, पियुष यादव, हेरंब परब, समीत आर्यन मिश्रा, शुभम तारी, जगदीश पाटील, दीप कसवणकर, किथ पिंटो, मनीश पै काकोडे, यश पोरोब व वीर यादव.
आंध्रप्रदेश संघ ः पी. गिरीनाथ रेड्डी, वाय. संदीप, टी. वाम्सी कृष्णा, शेख रशीद, के. महीपकुमार, एस. तरुण, धुवकुमार रेड्डी, पी. अविनाश, टी. विजय, एस. के. इस्माईल, एम. अंजनेयूलू, साकेत राम, के. एस. एन. राजू, बी. संतोषकुमार, ब्रह्मा तेजा, सत्यनारायण राजू, के. अजयकुमार, पी. तेजस्वी व के. रेवंथ रेड्डी.









