लेखी परीक्षेत उत्तीर्ण होवूनही संशोधन करणारे विद्यार्थी हवालदिल; विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका; प्रवेशापासूनच प्रवेश फी घ्यावी
कोल्हापूर / अहिल्या परकाळे
शिवाजी विद्यापीठाने 28 ऑक्टोबर 2021 ला पीएच. डी. प्रवेशपुर्व लेखी परीक्षा घेतली. त्यानंतर मुलाखतीही झाल्या, परंतू गेल्या चार महिन्यापासून गाईडच्या प्रतिक्षेत जवळपास 50 पैकी 32 विषयांचे सर्वसाधारण आठशे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष आर्धे संपले तरी गाईड नसल्याने पीएच. डी.चे संशोधक विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. एवढेच काय पण 4 विषयांचे अद्याप निकालच जाहीर झालेले नाहीत, अशी माहिती पुढे येत आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शिक्षण न घेतलेल्या वर्षीचे शुल्क भरावे लागणार आहे. त्यामाळे जवळपास आठ ते दहा हजारांचा भुर्दंड विद्यार्थ्यांना सोसावा लागणार आहे, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.
विद्यापीठ अंतर्गत पीएच. डी. किंवा एम. फिल.साठी प्रवेशपुर्व परीक्षा घेण्यापुर्वी प्रत्येक विषयांच्या गाईडकडे किती जागा शिल्लक आहेत. याचा आढावा घेणे विद्यापीठाचे कर्तव्य आहे. त्यानुसार जागांची निश्चती करूनच परीक्षा घेतली जाते, हे खरे असले, तरी गेल्या चार महिन्यापासून 50 पैकी 32 विषयांच्या विद्यार्थ्यांना गाईड का मिळालेला नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. विद्यापीठाच्या या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान सोसावे लागणार. परंतू त्या पलीकडे जावून संशोधनासाठी मिळणाऱया विविध प्रकारच्या फेलोशिपवर पाणी सोडावे लागणार यात शंका नाही. याबद्दल तक्रार केली तर शैक्षणिक नुकसान होईल, या भितीने थेट तक्रार करायला विद्यार्थी धजावत नाहीत. संशोधनाला चालना देणाऱया विद्यापीठात पीएच. डी. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची कुचंबना होत आहे? अशी चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे.
कोरोना कालावधीत सध्या पीएच. डी. करणाऱया विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडला आहे. यातून ते सावतात तांपर्यंत पीएच. डी. करणाऱयांना गाईड मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. संशोधनाचा ध्यास असणाऱया काही विद्यार्थ्यांना शुल्कांचा आकडा झेपणारा नसला, तरीही अनंत अडचणींचा सामना करीत ते पीएच. डी. ला प्रवेश घेतात. यातील काही विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळण्याऐवजी गाईड अलॉटमेंटच्या दिरंगाईमुळे नुकसानच सहन करावे लागते. दुसरीकडे आणखी काही महिन्यांनी पुढच्या वर्षीचे प्रवेश शुल्क भरण्याच्या सूचना मिळणार या भितीने त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. या संपूर्ण प्रक्रियेला जबाबदार कोण ? याचा विचार विद्यापीठ प्रशासन कधी करणार ? असा सूर शिक्षण वर्तुळात आहे.
परीक्षेनंतर निकाल व गाईड अलॉट विषय संख्या
परीक्षा विषय निकाल लागलेले विषय प्रलंबित निकाल विषय गाई अलॉटमेंट विषय गाईड अलॉटमेंटदिरंगाईविषय पीएच. डी. जागा
50 46 4 18 32 106
शिवाजी विद्यापीठाने प्रवेशापासून पुढचे शुल्क अकारावे
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत पीएच. डी. प्रवेशाला विद्यापीठ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे उशिल झाला आहे. तरी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र दिल्यापासूनच्या तारखेपासून पुढचे प्रवेश शुल्क अकारावे, अशी मागणी नाव न सांगण्याच्या अटीवर विद्यार्थ्यांमधून होत आहे.
प्रवेशानंतर प्रवेश शुल्क अकारा
विद्यार्थी हित लक्षात घेवून पीएच. डी.च्या प्रवेशाचे पत्र दिल्यापासून प्रवेश शुल्क अकारण्याच्या सूचना अधिकाऱयांना दिल्या आहेत. त्यामुळे पीएच. डी. करू इच्छिणाऱया विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावे. कोणाचेही शैक्षणिक किंवा आर्थिक नुकसान होणार नाही.
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के (शिवाजी विद्यापीठ)









