प्रतिनिधी /पणजी
अखिल भारतीय काँग्रेस समितीने ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची गोवा राज्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या संदभा&तील आदेश समितीचे पदाधिकारी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी जारी केला आहे. ते लवकरच गोव्यात येऊन काँग्रेस पक्षाची निवडणूक रणनिती आखण्याचे काम हाती घेणार असल्याचे पक्षाच्या सुत्रांनी सांगितले. त्यांचे नियुक्तीपत्र गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नावे पाठवण्यात आले आहे.
काँग्रेसचे गोवा प्रभारी गुंडू राव यांचे पद व स्थान कायम असून त्यात कोणताहि बदल नाहि. चिदंबरम यांचे पद व स्थान वेगळे असून गोवा विधानसभा निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठाRशी राज्यस्तरीय समन्वय साधण्याचे कामहि त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
प्रदेश काँग्रेस समितीकडून स्वागत
दरम्यान चिदंबरम यांच्या नेमणुकीचे गोवा प्रदेश काँग्रेस समितीने स्वागत केले आहे. आगामी 2022 च्या विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्ष बहुमताने जिंकणार याचा विश्वास गोवा प्रदेश काँग्रेस समितीला आहे. गोव्याची अस्मिता सांबाळण्यासाठी काँग्रेस पक्ष सत्तेत येणे गरजेचे आहे ह्या गोमंतकीय जनतेच्या भावनांची दखल काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने घेतल्याचे हे द्योतक आहे असे प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांना स्फूर्ती : कामत
काँग्रेसचे वरीष्ट नेते पी चिदंबरम यांची गोव्याचे निवडणूक रणनितीकार व निरीक्षक म्हणून झालेली नेमणुकीने गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना स्फूर्ती मिळाली असुन, त्यांच्या मार्गदर्शनाने व अनुभवाने काँग्रेस पक्ष गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकांत सत्ता संपादन करणार आहे असे काँग्रेस विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.









