प्रतिनिधी /पणजी
गोव्याचे नवनियुक्त राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचा शपथविधी 15 जुलै रोजी राजभवनात होणार असून त्यांना शपथ देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गोव्यात येणार आहेत. सध्या गोवा राज्याचा राज्यपालपदाचा ताबा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे आहे. श्रीधरन यांच्या नियुक्तीमुळे गोव्याला पूर्णवेळ राज्यपाल मिळाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गोव्याचा अतिरिक्त ताबा राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे आहे. यापूर्वी सत्यपाल मलिक यांच्याकडे गोव्याचा ताबा होता.









