वार्ताहर /किणये
पिरनवाडी परिसरात टाकण्यात आलेल्या कचऱयामुळे या भागात भटक्मया कुत्र्यांचा संचार वाढला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवासीवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक वेळा ही कुत्री नागरिकांच्या अंगावरही धावून जाऊ लागली आहेत. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पिरनवाडीतील कचऱयाच्या समस्येने नागरिक अक्षरशः वैतागून गेले आहेत. या कचऱयामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेच प्रयत्न होत नसल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. आता यातच अधिक भर पडली आहे, ती म्हणजे भटक्मया कुत्र्यांची.
पिरनवाडी परिसरात ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचलेले आहेत. या ढिगाऱयांजवळ ही कुत्री निदर्शनास येत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनधारकांना व काही बालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.
बेळगाव-चोर्ला रोड, पिरनवाडी नाल्याजवळ तसेच बेळगाव-पणजी महामार्गालगत असलेल्या भाजी मार्केटच्या बाजूला टाकण्यात आलेल्या कचऱयाच्या ठिकाणी कुत्र्यांचा संचार वाढलेला आहे. या भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
दोन वर्षापूर्वी पिरनवाडी येथील एका महिलेला कुत्र्याने चावा घेतला होता. गतवषी मच्छे येथे एका बालकालाही कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली आहे. अशा अनेक घटना वारंवार घडत असूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पिरनवाडी नाल्याच्या बाजूला असलेल्या कचऱयाच्या ढिगाऱयाजवळ 10 ते 12 कुत्र्यांचा संचार असतो. या ठिकाणाहून ये-जा करणाऱया वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. कारण त्या ठिकाणी कुत्री कधी अंगावर धावून जातील, याचा नेम नसतो.
यापूर्वी कर्ले, नावगे येथील तरुणांच्या अंगावर कुत्री धावून गेल्यामुळे किरकोळ अपघातांच्या घटना घडलेल्या आहेत. मोठी दुर्घटना होण्याआधीच योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.









