प्रतिनिधी/ सातारा
लॉकडाऊन असूनही शहरात सोशल डिस्टन्स न पाळता पेठ रविवार येथील आकार हॉटेल समोरील फुटपाथ वरील भाजी विक्रेते यांना व पेठ सदाशिव जुनी मंडईमध्ये नागरीक गर्दी करत असल्याने पालिकेच्या धडक पथकाने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी रंजना गगे यांच्या सुचनेनुसार अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने अडीच हजार रुपयांचा दंड वसूल केला.
विना मास्क व सोशल डिस्टन्शिंग चे पालन न केल्याने पालिकेच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. राजवाडा ते मंगळवार तळे रस्ता कारवाई करण्यात आली आहे असून रस्ता रिकामा केला आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार करण्यात आली होती. पालिकेच्या पथकाने मोहीम राबवून कारवाई केली. कारवाईसाठी पथक बाजारपेठेत पोहचताच पळापळ झाल्याचे चित्र दिसत होते.








