वार्ताहर /पालये
पालये येथील श्री भूमिका वेताळ देवस्थानच्या अध्यक्षपदी एकनाथ तुकाराम परब यांची फेरनिवड झाली. अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे ः उपाध्यक्ष – श्यामसुंदर जयराम परब, सचिव – जितेंद्र सदानंद तिळवे, उपसचिव – राजेंद्र उत्तम तिळवे, मुखत्यार – रवळू तुकाराम परब, उपमुखत्यार – संजय चंद्रकांत परब, खजिनदार – शांताराम उत्तम परब, उपखजिनदार – मच्छींद्रनाथ अनंत परब.
खजिनदार व उपखजिनदार वगळता अन्य पदाधिकाऱयांची बिनविरोध निवड झाली. शांताराम उत्तम परब यांनी 168 मते प्राप्त करून खजिनदारपद प्राप्त केले. त्यांचे प्रतिस्पर्धी साईश परब यांना 133 मते प्राप्त झाली. 14 मते बाद ठरली. मच्छींद्रनाथ अनंत परब यांनी 183 मते प्राप्त करून उपखजिनदारपद प्राप्त केले. त्यांचे प्रतिस्पर्धी रवींद्र अच्युत परब यांना 116 मते प्राप्त झाली. 16 मते बाद ठरली. निर्वाचन अधिकारी म्हणून पेडणे मामलेदार कार्यालयाचे संतोष नाईक यांनी काम पाहिले. त्यांना निवडणूक प्रक्रियेसाठी जितेंद्र तिळवे यांनी सहकार्य के पांडुरंग सदाशिव परब यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूकप्रक्रिया झाली.









