प्रतिनिधी / विटा
गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीने शेतीसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांची थेट बांधावर जाऊन माहिती घेतली. खानापूर तालुक्यातील कार्वे, खानापूर आणि बेनापूर येथील शेतकऱ्यांशी थेट बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली.
यावेळी माजी आमदार सदाशिव पाटील, जिल्हाअध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासो मुळीक, बाळासाहेब पाटील, सुशांत देवकर, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषीकेत शेळके उपस्थित होते. मागील आठवड्यात तासांपासून दुष्काळी खानापूर तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. झालेल्या या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले. खानापूर तालुक्यात एका आठवड्यात सलग दोन वेळा अतिवृष्टी झाली आहे. यामुळे परिसरात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.









