तेर्सेबांबर्डे येथे खुल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन : पहिल्या दिवशीचे सामने ठरले रंगतदार
वार्ताहर / कुडाळ:
तेर्सेबांबर्डे-मळावाडी येथे रुपेश कानडे मित्रमंडळ, ऍड. विवेक उर्फ बंडय़ा मांडकुलकर मित्रमंडळ, उमेश धुरी मित्रमंडळ व समीर हळदणकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक लाख रुपये पारितोषिक असलेल्या खुल्या ओव्हरआर्म टेनिस बॉल प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी (बुधवारी) ध्रुव (पार्से-गोवा) संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. आजच्या रंगतदार सामन्यांचा क्रीडा रसिकांनी आनंद लुटला.
मुंबई-गोवा महामार्गानजीकच्या मैदानावर पाच दिवस चालणाऱया या स्पर्धेला आज प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उद्घाटन जि. प. उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. जि. प. माजी अध्यक्ष विकास कुडाळकर व दिनेश साळगावकर, माजी सभापती ऍड. बंडय़ा मांडकुलकर व मोहन सावंत, तेर्सेबांबर्डे ग्रा.पं. सदस्य रुपेश कानडे, साळगाव सरपंच उमेश धुरी, माजी सरपंच समीर हळदणकर, नगरसेवक सुनील बांदेकर, पावशीचे माजी सरपंच पप्या तवटे, तेर्सेबांबर्डे सरपंच संतोष डिचोलकर, ग्रा.पं. सदस्य गुणाजी जाधव, रामचंद्र परब, दीप्ती कानडे व अंकिता बांबर्डेकर, तेर्सेबांबर्डे माजी सरपंच सदानंद सडेकर व सुभाष परब, बिबवणे माजी सरपंच दादा चव्हाण, माजी उपसभापती मोहन सावंत, हुमरस माजी सरपंच सोनू मेस्त्राr, ग्रा.पं. सदस्य सीताराम तेली, मांडकुली माजी सरपंच रुपेश मराठे, तेर्सेबांबर्डे माजी उपसरपंच अजय डिचोलकर, आशिष सडेकर, साळगाव ग्रा.पं. सदस्य अमित दळवी, खवणे ग्रा.पं. सदस्य संजय परब, संजय डिचोलकर, रवींद्र कानडे, वैभव शेणई, रमेश परब, प्रभाकर डिचोलकर, गुरू मेस्त्राr, राजवीर पाटील आदींसह मंडळांचे पदाधिकारी, खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, उपाध्यक्ष राजू राऊळ, माजी सभापती संजय वेंगुर्लेकर व अभय परब, पं. स. सदस्या स्वप्ना वारंग, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, नगरसेविका संध्या तेर्से, बंडय़ा सावंत आदींनी स्पर्धेला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
रणजीत देसाई यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. नाणेफेकीनंतर पहिला सामना लीशा स्पोर्टस् (सावंतवाडी) विरुद्ध रुद्र स्पोर्टस् (कणकवली) यांच्यात झाला. पहिल्या दिवशी लीशा स्पोर्टस्, रुद्र स्पोर्टस्, ध्रुव (पार्से-गोवा) व रौनक (गोवा) यांच्यात साखळी पद्धतीने सामने खेळविण्यात आले. यात ध्रुव संघाने उपांत्य फेरी गाठली. नाणेफेक जिकणाऱया संघाला चांदीचे नाणे व सहभागी संघातील खेळाडूंना टी-शर्ट देण्यात येत आहेत. नेटक्या नियोजनाचे मान्यवरांनी कोतुक केले. तालुका मर्यादित नऊ खेळाडूंमुळे नवीन खेळाडूंना संधी मिळेल, असे त्यांनी सांगत शुभेच्छा दिल्या
पंच म्हणून उमेश मांजरेकर, मंगेश धुरी व महेश डोंगरे यांनी काम पाहिले. समालोचन बादल चौधरी, समीर पांढरे व भूषण नाईक यांनी केले. गुणलेखन राकेश शिंदे यांनी केले. 9 जानेवारी रोजी रामेश्वर (घावनळे), प्रेंडशिप (चेंदवण), गणपती वारिअर्स (गोवा ) व स्पोर्टस् बॉईज (नाबरवाडी) यांच्यामध्ये सामने होणार आहेत.









