प्रतिनिधी/ डिचोली
पार्वतीनगर कुळण सर्वण डिचोली येथील अल्पना अविनाश माईणकर कुडणे येथील तिच्या सासरच्या ठिकाणी चालु असलेल्या मालमत्तेच्या वादातून अपहरण करण्यात आल्याची तक्रार सदर महिलेचे पती अविनाश माईणकर यांनी डिचोली पोलीस स्थानकात केली आहे. 4 जुलै रोजी दु. 3 वा. नंतर सदर महिला आपल्या घरातून गायब आहे, असे सदर तक्रारीत म्हटले आहे.
शनि. दि. 4 रोजी दुपारी अल्पना माईणकर या आपल्या कुळण येथील निवासस्थानी आल्या. नंतर 3 वा. च्या सुमारास त्या घरातून अचानकपणे गायब झाल्या. त्यांची पर्स मोबाईल, चप्पल तसेच दुचाकीही घरातच होती. घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध करून शनिवारी रात्री डिचोली पोलीस स्थानकात बेपत्ता तक्रार नोंदवली होती. मात्र या घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही न सापडल्याने तिच्या घरच्यांनी सहा जणांची नावे पोलीस स्थानकात देत त्यांच्यावर संशय व्यक्त करून अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी डिचोली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे.









