बेळगाव
येथील दि पायोनिअर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. शनिवारी उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सात उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया टळली आहे.
पायोनिअर अर्बन बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी जुन्या संचालकांपैकी पाच संचालकांना अपात्र ठरविण्यात आल्यामुळे निवडणूक प्रक्रिया कशी पूर्ण होणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले होते. मात्र, शनिवारी अर्ज माघारीनंतर संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकाऱयांनी केली.
नूतन संचालकांमध्ये रमेश सोमनाथ शिंदे, गजानन मल्लाप्पा पाटील, शिवराज नारायण पाटील, रणजित बापूसाहेब चव्हाण-पाटील, प्रदीप मारुती अष्टेकर, रवि अर्जुन दोड्डण्णवर, अनंत चांगप्पा लाड, (सामान्य गट) विद्याधर योगा कुरणे, (अनु. जाती) मारुती पुंडलिक शिगीहळ्ळी, (अनु. जमाती) सुहास अर्जुन तरळे, गजानन अमृत ठोकणेकर (मागास अ गट), सुवर्णा राजाराम शहापूरकर, लक्ष्मी दत्ताजी कानूरकर (महिला गट)यांचा समावेश आहे.









