कॅनडाच्या शहरात आणीबाणी लागू
कॅनडाच्या इकालुइट शहरात पाण्याच्या पुरवठय़ात इंधनाचे मोठे प्रमाण मिळत आहे. हे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. शहर प्राधिकरणाने यामुळे शहरात आणीबाणी लागू केली आहे. लोकांना प्रशासनाकडून वेगळय़ा मार्गाने पाणी पुरविले जात असून याकरता लोक रांगेत उभे राहून स्वतःच्या गरजेपुरते पाणी भरत आहेत.

शहराच्या पाण्याच्या टाक्यांपैकी एकाच्या चाचणीत अनेक प्रकल्पाच्या फ्यूल कम्पोनेंटचे अधिक प्रमाण आढळून आले आहे. हे घटक बहुधा डिझेल किंवा केरोसीनचे होते असे शहराचे मुख्य प्रशासकीय अधिकारी एमी एल्गर्स्मा यांनी सांगितले आहे. शहरातील रहिवाशांनी पाण्याला इंधनाचा गंध येत असल्याचे कळविले होते. पण इंधन कुठून येतेय हे अद्याप समजू शकलेले नाही.
उकळल्यावरही हे पाणी सुरक्षित नसल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. हे इंधन माती किंवा भूजलाद्वारे टाकीत शिरले असल्याचा संशय आहे.
दीर्घकालीन आरोग्य प्रभावांची (पाणी पिणाऱयांसाठी) जोखीम सध्या चिंतेचा विषय नाही. कार्सिनोजनिक रसायनांचे पुरावे मिळालेले नाही. पण बेंजीन आणि टोल्यून दोन्ही इंधनात आढळून येत असल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मायकल पॅटरसन यांनी म्हटले.









