दुरुस्तीसाठी आज-उद्या पाणीपुरवठा बंद
प्रतिनिधी /बेळगाव
शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होतो न होतो तोच पुन्हा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. तुमरगुद्दी परिसरात रेल्वे फाटकाजवळ हिडकल जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे दि. 9 रोजी सकाळी 6 वाजल्यापासूनच पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी 24 तास पाणीपुरवठा योजनेसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱया हिडकल जलवाहिनीला गळती लागल्याने शहराचा पाणीपुरवठा दहा दिवस बंद होता. पण अलीकडेच पाणीपुरवठा सुरळीत होत असतानाच आता पुन्हा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. तुमरगुद्दीजवळ रेल्वे क्रॉसिंगजवळ जलवाहिनी स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. शनिवार दि. 9 रोजी सकाळी 9 पासून पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून दि. 10 रोजीदेखील पाणीपुरवठा करता येणार नाही. परिणामी शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. अलीकडेच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
सहकार्याचे आवाहन
24 तास पाणीपुरवठा योजनेसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने पाणी समस्या निर्माण होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पायाभूत सुविधा मंडळ आणि एलऍण्डटी कंपनीने केले आहे.









