ऑनलाईन टीम/तरुण भारत
बिहार राज्याच्या पटणा २०१३ साली पाटणा शहरात झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील चार आरोपींना एनआयएकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅली दरम्यान हे साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात एकून ९ आरोपींना अटक करण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांची सभा सुरु होण्यापूर्वी हे स्फोट झाले होते.
एनआयएकडून या प्रकरणात अत्यंत जलदगतीने तपास करत आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. यावेळी एकूण ६ लोकांचा मृत्यू झाला होता तर ८० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. या साखळी बॉम्ब स्फोटातील शेवटचा स्फोट हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाच्या २५ मिनीटं आधी झाला होता.