शहर प्रतिनिधी/ पाटण
स्वा. सै. स्व. बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाटण येथे आयोजित ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलनाचा ग्रंथदिंडीने मोठय़ा दिमाखात शुभारंभ झाला. डॉ. अर्चना देशमुख, डॉ. सुहास देशमुख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ग्रंथदिंडीला सुरूवात झाली.
स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी साहित्य संमेलन व ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध मान्यवर साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी, यांच्यासह विविध शाळा, महाविद्यालये, बालवाडय़ा, प्राथमिक शाळांचे आकर्षक चित्ररथ सहभागी झाले होते. विद्यार्थी, साहित्यप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, संयोजन समितीचे सदस्य पत्रकार ए. व्ही. देशपांडे, सोमनाथ आग्रे, रवींद्र सोनवले, ऍड. नाना मोरे, फत्तेसिंह पाटणकर, नानासाहेब पवार, शफी खतीब, डॉ. नांगरे, गोरख नारकर, डॉ. बी. बी. पाटील, शिंदेसर, संजय कुंभार, वाडेकर, विजया म्हासुर्णेकर, डॉ. विना नांगरे, डॉ. विद्या पाटील, डॉ. रघुनाथ नांगरे, रत्ना शिंदे, धनश्री मोरे, अमित बेडके, पत्रकार शंकरराव मोहिते, विक्रांत कांबळे, नितीन खैरमोडे, विद्या म्हासुर्णेकर, सुरेश संकपाळ, नानासाहेब पवार, बाबा सुतार, संजय डुबल, संजय कांबळे, मुख्याध्यापक सुशिलकुमार कांबळे, दत्तात्रय कराड, विशाल देसाई, शोभा थोरात, सचिन घाडगे, अजित साळुंखे, मुख्याध्यापक प्रतिभा सावंत, बबीता पावरा, नम्रता मोहिते, प्रविण शिंदे, सागर मोजर, मुख्याध्यापक अतुलकुमार सावंत, अमोल जाधव, यमगर, उमेश यादव आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सदर ग्रंथदिंडीत पद्मावती विद्यालय वनकुसवडे, सरस्वती विद्यालय रूवले, न्यू इंग्लिश स्कूल सळवे, न्यू इंग्लिश स्कूल कोळेकर, पाटणकर प्राथमिक विद्यालय पाटण, कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल यांच्यासह विविध शाळाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते. पाटण नगरपंचायतीपासून मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर ग्रंथदिंडी जुना बसस्थानक, झेंडा चौक, व्यापारी पेठ, लायब्ररी चौक, राजवाडा, तहसील कार्यालयमार्गे संमेलनस्थळी पोहोचली. ग्रंथदिंडीत ठिकठिकाणी चौकाचौकात पथनाटय़ांचे सादरीकरण करण्यात आले.
संमेलनस्थळी दिंडीचे आगमन झाल्यावर विविध स्टॉलचे उद्घाटन कला शिक्षक अरूण खांडके यांच्या हस्ते झाले. सामाजिक कार्यकर्त्या पैगंबर आयेशा इक्बाल सय्यद प्रवेशद्वाराचे उद्घाटन लेखक, कवी, गीतकार शफी खतीब यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्य सैनिक स्व. भडकबाबा पाटणकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तसेच डॉ. श्रीराम लागू व्यासपीठ, पत्रकार कै. दादासाहेब कदम कवी कट्टा याचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध श्रेत्रातील मान्यवर व साहित्यिक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचलन खाशाबा चव्हाण यांनी केले.









