वार्ताहर/कास
ऐतिहासिक किल्ले वासोटा पाहण्यासाठी बहुसंख्य पर्यटक व गिरीप्रेमी पर्यटनास येत असुन काही बालमावळ्यांचा उत्साह देखील मोठया प्रमाणावर दिसुन येत आहे. साताऱ्यातील हेरंब चव्हाण या पाच वर्षाच्या चिमुकल्याने छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषात किल्ले वासोटा सर केला. त्याचे गिरीप्रेमींकडून विशेष कौतुक होत होते.
अवघ्या पाच वर्षाच्या हेरंब या बालमावळ्याने कोणाच्याही मदतीशिवाय न दमता छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत खाचखळगे, घसरटे दगडगोटे पार करून दोन तास खडी चढाई व दीड तास तीव्र उतार यशस्वीरित्या पार केला. दरम्यान त्याच्या समवेत सात ते दहा वर्षाच्या ऋचा चव्हाण, कृपा साळुंके, मनस्वी चव्हाण या तिघी चिमुरडी देखील होत्या. त्यांचेदेखील गिरिप्रेमींकडून टाळ्या वाजवून विशेष कौतूक केले जात होते.
चोंहोबाजुला दाट हिरवीगार झाडी त्यात खडतर तसेच पुर्णतः चढ -उतार म्हणजे गिरीप्रेमींसाठी खास पर्वणीच. यामुळे ट्रेकिंगसाठी बहुतांशी पर्यटक या ठिकाणी येतात. दरम्यान दीड – दोन तासाचा पायी प्रवास करत छत्रपती शिवाजी महाराज की जय , छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत मोठया उत्साहाने हा किल्ला सर करताना दिसतात. यामध्ये चिमुकल्यांचादेखील उत्साह मोठया प्रमाणावर दिसून येत होता.
कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वासोटा हा वनदुर्ग. दुर्गप्रेमींचे ट्रेकिंगसाठी आकर्षक ठिकाण म्हणजे ऐतिहासिक किल्ले वासोटा. व्याघ्र प्रकल्प व बामणोली वन्यजीव वनक्षेत्रातील किल्ले वासोटा बफर व कोअर क्षेत्रात येते. साहसी ट्रेकची आवड असणारे अनेक दूर्गप्रेमींचे आकर्षण. वनखात्याच्या चेकपोस्टपासून पुढे खड्या चढाईने दोन तासात किल्याच्या माथ्यावर पोहचता येते. संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक मोठ्या संख्येने वासोटा ट्रेकींगसाठी येत आहेत. शनिवार, रविवारी बहुसंख्य पर्यटक ट्रेकिंगसाठी येताना पाहायला मिळतात.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









