ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
देशातील नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे. लस खरेदीसाठी पाक सरकारने 150 दशलक्ष डॉलर्सच्या निधीला मंजुरी दिली आहे. आरोग्य विभागाच्या संसदीय सचिव नौशीन हमीद यांनी यासंदर्भात माहिती दिली.
हमीद म्हणाले, चीनमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. लवकरच या टप्प्यातील निष्कर्ष समोर येतील, त्यानंतर नागरिकांना ही लस उपलब्ध करून दिली जाईल. पाकिस्तान चीनकडून ही लस खरेदी करणार आहे. त्यामुळे एप्रिल 2021 पासून या लसीकरण मोहिमेस सुरुवात होणार आहे.
पाकिस्तानात आतापर्यंत 4 लाख 13 हजार 191 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 3 लाख 52 हजार 529 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 52 हजार 359 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 8 हजार 303 रुग्ण दगावले आहेत.









