ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात स्वतंत्र ‘सिंधू राष्ट्रा’ची मागणी जोर धरत असून, रविवारी सान शहरात नागरिकांनी मोठा मोर्चा काढला. विशेष म्हणजे या मोर्चात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य देशांच्या पंतप्रधानांचे फ्लेक्स झळकले. जागतिक नेत्यांनी सिंधला वेगळा देश स्थापन करण्यास मदत करावी, असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले.
रविवारी जीएम सय्यद यांची 117 वी जयंती होती. सय्यद हे आधुनिक सिंधी राष्ट्रवादाचे संस्थापक मानले जातात. त्यामुळे जयंतीचे निमित्तसाधत सिंधला वेगळा देश बनवण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
मोर्चादरम्यान आंदोलकांनी स्वातंत्र्यसमर्थक घोषणा दिल्या. सिंधू हे सिंधू खोरे व्यवस्थेचे आणि वैदिक धर्माचे निवासस्थान आहे, असा दावा त्यांनी केला. तो बेकायदेशीररित्या ब्रिटिश साम्राज्याच्या ताब्यात होता आणि स्वातंत्र्याच्या वेळी पाकिस्तानच्या इस्लामी हातांना देण्यात आला होता, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.









