वृत्तसंस्था/ कराची
झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱया तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी पाकने जखमी शदाब खानच्या जागी झाहिद मेहमूदची निवड केली आहे. 21 एप्रिलपासून या मालिकेला हरारेत प्रारंभ होणार आहे.
पाक संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत असून त्यानंतर झिम्बाब्वे दौऱयावर जाणार आहे. रविवारी झालेल्या दुसऱया वनडेमध्ये शदाब खानच्या बोटाला दुखापत झाल्याने त्याला संघाबाहेर रहावे लागणार आहे. दुसऱया वनडेत 193 धावांची खेळी केलेल्या फख्र झमानलाही टी-20 संघात स्थान देण्यात आले असून तो संघासोबतच राहणार आहे. झाहिदची झिम्बाब्वेविरुद्ध दोन कसोटीसाठी निवड करण्यात आली होती तर फख्र झमानला वनडेसाठी निवडण्यात आले होते. दोन्ही बदल राष्ट्रीय निवड समितीने मान्य केले असल्याचे पीसीबीने सांगितले.









