कामाचा विचार करून आर्थिक मदत द्या : वृत्तपत्र विपेत्यांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
पाऊस, वारा, थंडी याची तमा न बाळगता प्रत्येकाच्या घरी वृत्तपत्रे देण्याचे काम आम्ही करत आलो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही हे काम करत असताना विविध अडचणींचा सामना करत आहे. कोरोना काळातदेखील आमचे काम सुरूच होते. त्या काळात अनेक घटकांना आर्थिक मदत करण्यात आली. पेपर विपेत्या एजंटनादेखील 2 कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र आजतागायत एकाही पेपर विपेत्या एजंटला एक रुपयाही दिला गेला नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करून मंजूर झालेले दोन कोटी पेपर विपेत्यांना द्यावेत, या मागणीसाठी बेळगाव वार्तापत्र विपेता संघातर्फे जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
कोणताही सण असो, यात्रा असो आपली स्वतःची कामे असोत किंवा आजारी पडो पेपर विपेता हा भल्या पहाटे उठतो. पेपर घेतो तो सायकलवरून फिरून प्रत्येकाच्या घरी पेपर पोहोचवितो. समाजाला प्रत्येक घटनेची माहिती त्या माध्यमातून देण्याचे महत्त्वाचे काम आम्ही करत आहे. मात्र आमच्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळय़ामध्ये भिजत आम्ही पेपर पोहोचवतो. तर कडाक्मयाच्या थंडीत देखील आम्ही हे काम करत असतो. आमचे कष्ट पाहता मिळणारे कमिशन असो किंवा वेतन हे कमी आहे.
कोरोना काळात कामगारांना तसेच इतरांना मदत केली गेली आहे. मात्र आम्हाला कोणत्याच प्रकारे मदत केली नाही. तेंव्हा याचा विचार करून जे दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत ती रक्कम वितरित करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रताप भोसले, संजय कदम, विशाल देशपांडे, नामदेव, विनायक राजगोळकर, पिराजी गावडे, प्रशांत शहापूरकर, सुभाष गोरे, संजय घोरपडे, गोपीनंद धुपटना यांच्यासह इतर एजंट उपस्थित होते.









