रामनगर
बेळगाव-गोवा महामार्गावरून खानापूरपासून रामनगरपर्यंत वनखात्याच्या निर्बंधामुळे रस्ताकाम अर्धवट स्थितीत असून गुरुवारी सायंकाळी झालेल्या पहिल्याच पावसात अनेक अवजड वाहने रस्ता सोडून खाली उतरली तर अनेक दुचाकी घसरून पडल्याने अनेकांना किरकोळ अपघात झाले. तर या मार्गावरील जूमतळे येथे गोवा येथून बेळगावला जाणारा 12 चाकी ट्रक रस्त्यातील माती ढासळल्याने रस्त्याच्या मधोमध कोसळला. युमळे वाहतूक ठप्प झाली. पहिल्याच पावसात ही परिस्थिती मग पुढे पावसाळय़ात काय होईल? हा प्रश्न गंभीरच आहे.









