नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
‘झांसी की रानी’ या कवितेसाठी ओळखल्या जाणाऱ्या लोकप्रिय हिंदी कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांचा जन्म 16 ऑगस्ट 1904 रोजी झाला. सुभद्रा कुमारी चौहान यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त गुगलने सुभद्रा कुमारी चौहान यांच्या नावाचे डूडल बनवून त्यांना मानवंदना दिली आहे.
आज गूगलच्या होम पेजवर झळकणार्या डूडलवर सुभद्रा कुमारी चौहान या साडीमध्ये हातात पेन व पेपर घेऊन बसल्याच्या दिसत आहेत. त्यांच्यामागे राणी लक्ष्मीबाई घोड्यावर स्वार होऊन दौडत असल्याचं चित्र आहे. तसेच इतर काही स्वातंत्र्यसेनानी देखील असल्याचं दिसत आहे.
सुभद्रा कुमारी चौहान यांना भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या पहिल्या महिला सत्याग्रही म्हणूनही ओळखले जाते. हे गुगल डूडल न्यूझीलंडच्या कलाकार प्रभा मल्ल्या यांनी तयार केले आहे. सुभद्रा कुमारी चौहान त्यांनी लिहीलेल्या ‘झांसी की रानी’ या कवितेसाठी त्या ओळखल्या जातात.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









