वृत्तसंस्था/ थिरूवनंतपुरम
मंगळवारपासून येथे पहिल्या राष्ट्रीय खुल्या लांब उडी स्पर्धेला प्रारंभ होणार असून राष्ट्रीय विक्रमवीर एम. श्रीशंकर या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण राहील. केरळच्या 22 वर्षीय श्रीशंकरने गेल्यावर्षी लांब ंउडी प्रकारात 8.26 मी.चे अंतर नोंदवून राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता.
गेल्यावर्षी झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत श्रीशंकरची कामगिरी उल्लेखनीय झाली नाही. पात्र फेरीच्या गटात त्याने 7.69 मी.चे अंतर नोंदविल्याने त्याला 13 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. श्रीशंकरसाठी अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने त्याचे वडील एस. मुरली यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. दरम्यान टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर मुरली यांना प्रशिक्षकपद गमवावे लागले. मंगळवारपासून सुरू होणाऱया पहिल्या राष्ट्रीय खुल्या लांब उडी स्पर्धेत 29 महिलांसह 75 ऍथलीट्स सहभागी होत आहेत.









