ऑनलाईन टीम
बंगालमध्ये भाजपा आणि तृणमुल काँग्रेस कार्यकर्त्यांमधील संघर्ष काही केल्या कमी होत नाही. याच संघर्षातून राज्यात काही जणांच्या हत्या देखील झाल्या आहेत. यानंतर पुन्हा एकदा भाजपाच्या युवा नेत्याची हत्या झाली आहे. पक्षाचे युवा शाखा नेते मिथुन घोष यांची उत्तर दिनाजपूरच्या इटाहारमध्ये हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. बंगालचे भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी यासंबंधी माहिती दिली.
घोष यांच्या हत्येमागे तृणमुल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे.
सुवेंदू अधिकारी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “बीजेवायएम व्हीपी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील मिथुन घोष यांची इटाहार येथे हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. ही हत्या तृणमुल काँग्रेसने घडवून आणली आहे. रक्तरंजित असामाजिक शिकारी कुत्रे ज्यांनी आपल्या मालकाच्या आदेशाचं पालन करत मिथून घोष यांची हत्या केली. त्यांची वेळ आल्यावर त्यांच्यावर कारवाई केली जाईल,” असा इशारा अधिकारी यांनी मारेकऱ्यांना दिला आहे.
Previous Articleशिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीनं बजावले पुन्हा समन्स!
Next Article जवानांना आता वज्र अन् त्रिशूळाचाही आधार









