प्रतिनिधी / पर्वरी :
भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरे यांच्यावर पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांच्याकडून विधानसभा आवारात भ्याड हल्ला झाला. या हल्ल्याचा पर्वरी भाजप मंडळाने गुरुवारी हमरस्त्यावर जाहीर प्रदर्शने करीत तीव्र शब्दात निषेध नोंदविला. लवकरच याबाबतीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोलणी करणार असल्याचे किशोर अस्नोडकर यांनी पत्रकारांना सांगितले. खंवटे यांना आमदार म्हणून अपात्र घोषित करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून केली गेली.
यावेळी उत्तर गोवा भाजप अध्यक्ष महानंद अस्नोडकर, भाजप महिला मोर्चाच्या कुंदा चोडणकर, सुकूरचे सरपंच संदीप वझरकर, राधिका नाईक, कार्तिक कुंडईकर आदी मान्यवर उपस्थित होते. लोकशाही पद्धतीनुसार भाजपचे पक्ष प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरे यांनी पणजी पत्रकार परिषद घेऊन पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांच्या अवैद्य कारभाराचा पाढा वाचला होता. लोकशाहीत तसा प्रत्येकाचाच अधिकार असतो त्याबद्दल खंवटे यांनी उत्तर द्यायचेच असते तर एक सुजाण लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनीही पत्रकार परिषदेद्वाराच आपल्यावरील आरोपांचे खंडण करायचे होत.s असे ते म्हणाले.









